SEEDBAO

मुख्यपृष्ठ › उपयुक्त साधने

उपयुक्त साधने

शेवटचा बदल: 17 जुलै 2026SEEDBAO संपादक
क्रिप्टो मालमत्ता (VDA) आणि NFT यांचे नियमन कोणी करत नाही आणि त्यांमध्ये खूप मोठा धोका असू शकतो. अशा व्यवहारांतून नुकसान झाल्यास कोणताही नियामक दिलासा मिळणार नाही.

आठ साधनं, सगळी तुमच्याच ब्राउझरमध्ये चालणारी: लॉगिन नाही, माहिती कुठे पाठवली जात नाही, उघडलं की वापरता येतं आणि रिफ्रेश केलं की पुसलं जातं. प्रत्येक साधनाच्या पानावर ते काय काढून देतं आणि काय देत नाही हे स्पष्ट लिहिलं आहे, शिवाय आकडे कसे वाचायचे हे शिकवणारी दोन काल्पनिक उदाहरणं आहेत.

वापरायचा क्रम असा सुचवतो: हात लावण्याआधी एकदा संपूर्ण खर्च नियोजक चालवून ₹ मध्ये अंदाज घ्या; पहिल्या स्वॅपआधी स्लिपेज पूर्वावलोकन मधून सर्वात वाईट परिस्थितीत हातात किती येईल ते बघा; आणि दर तिमाहीला परत येऊन सुरक्षा तपासणीअप्रूव्हल तपासणी करून घ्या. साधनं "हिशेब" सोडवतात, लेख "समज" देतात — दोन्ही जोडीने वापरा.